बापलेकीबद्दल..

Friday, July 8, 2011

कधीकाळी, वाचलेल्या आणि आवडत्या पुस्तकांबद्दल लिहिलंच, तर 'बापलेकी'बद्दल लिहायचं, हे एक ठरवूनच टाकलं होतं. वाचलेल्या आणि 'आवडलेल्या' असं मुद्दाम म्हणतेय कारण, वाचलेली आणि न आवडलेलीही काहे पुस्तकं आहेत संग्रहात. त्यांच्याहीबद्दल पुन्हा कधीतरी.

पण 'बापलेकी' स्पेशल आहे, त्याला एक वैयक्तिक संदर्भही आहे, ते नंतर.

पुस्तक विकत घेण्याआधी पुस्तकाबद्दल बरंच ऐकलं होतं. एक दोघांकडून अनुकूल अभिप्रायही मिळाले होते, तेह्वा पुस्तक वाचण्याची उत्सुकता तर होतीच. जेह्वा हातात पडलं, तेह्वा वेळही न घालवता वाचायला घेतलं. तुम्हांला सवय आहे का, अगदी पहिल्या पानापासून पुस्तक वाचायची? मला आहे. अगदी पहिलं कोरं पान, ऋणनिर्देश, अर्पणपत्रिका, आवृत्त्या, किंम्मत अगदी त्यापासून ते मग प्रस्तावना, आणि मग लेखन. अगदी माझ्या कामासंबंधीही जी पुस्तकं मी वाचते, त्याचेही ऋणनिर्देश वा अर्पणपत्रिका कधीकधी अगदी सुंदर, मनापासून लिहिलेल्या असतात. वाचताना थबकायला होतं. मनात विचार येतो की, किती सुरेख नातं असू शकेल.. वाचल्यात कधी?

अपूर्ण..